मॅकडॉल्स नंबर 1 व्हिस्की दारूचे चौदा बॉक्स चोरीला
श्रीगोंदा प्रतिनिधी (दि.१०.जानेवारी):-नगर दौंड रोडवरील सायंतारा हॉटेल जवळ श्रीगोंदा तालुक्यातील चिखली शिवारात अज्ञात चोरट्याने मालवाहू गाडी नं. MH16 AE 7890 हिच्या पाठीमागील बाजूने वर चढून गाडीची ताडपत्री फाडून गाडीतील मॅकडॉल नंबर 1 व्हिस्कीचे ओरिजनल 94640/- रुपयांचे 14 बॉक्स चोरून नेल्याची घटना घडली आहे.याबाबत फिर्यादी संतोष गोरक्ष बडे (वय 29,धंदा व्यापार,रा.जोगेवाडी पो.चिंचपूर पांगुळ ता.पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस स्टेशन येथे भादविक 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास मपोना/काळे करीत आहेत.