Maharashtra247

नवनागापूर मध्ये मारहाण करून मुलांची काढली धिंड;नातेवाईकांनी केला मोठा आरोप

अहमदनगर (दि.२५ जुन प्रतिनिधी):-अल्पवयीन मुलांना लोखंडी रॉड,कुर्‍हाडीच्या दांडक्याने मारहाण करून त्यांची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढल्याची धक्कादायक घटना नवनागापूर परिसरात घडली.मारहाण झाल्यानंतर अल्पवयीन मुले नातेवाईकांसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता त्यांची फिर्याद नोंदवून घेतली गेली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मारहाणीत जखमी झालेल्या दोन अल्पवयीन मुलांवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे.अल्पवयीन मुलांना मारहाण करून त्यांची अर्धनग्न धिंड काढण्याचा गंभीर प्रकार एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडल्यानंतर नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात जाऊन या संदर्भात माहिती दिली परंतु तेथे उपस्थित असलेल्या अधिकारी व अंमलदारांनी त्यांना तात्काळ रूग्णालयात जाण्यास सांगितले.याव्यतिरिक्त त्यांची कुठलीच दखल घेतली नाही.असे मुलांच्या नातेवाईकांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page