शेंडी-पोखर्डी गावात बालविवाह जनजागृती कार्यक्रम संपन्न..मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग..
अहमदनगर (दि.२६ जुन प्रतिनिधी):-अहमदनगर जिह्यात स्नेहालय संचलित उडान प्रकल्प जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील वाड्या-वस्ती,झोपडपट्ट्या मध्ये जाऊन उडान टीम बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि त्यांचे दुष्परिणाम विषयी जनजागृती मोहीम मोठ्या राबवत आहे.याच अनुषंगाने नगर तालुक्यातील शेंडी आणि पोखर्डी या दोन गावात दि.२५ जून रोजी बाल विवाह जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाप्रसंगी प्रथम शेंडी गावच्या सरपंच सौ.प्रज्ञा लोंढे यांनी उडान टीमचे स्वागत केले.
यानंतर उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना प्रथम उडानचे प्रकल्प व्यवस्थापक श्री.प्रवीण कदम यांनी स्नेहालय संस्था आणि उडान प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.बालविवाह रोखण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेऊन गाव बालविवाह मुक्त गाव करण्यासाठी चे आवाहन यावेळी केले.गावात बाल संरक्षण समिती स्थापन करून गावातील प्रत्येक बालकाला सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा.सध्या मुलींचे अनेक प्रकारचे प्रश्न पालकांसमोर उभे असतात.त्या समस्या कशा सोडवावे यावर अनेक प्रकारच्या पालकांना समजत नाही. यावेळी कॉल करणे आपल्या मुलांना विश्वासात घेऊन कसे मार्गदर्शन केले पाहिजे, कशी समजूत पाल्याची काढली पाहिजे,यावर सकल मार्गदर्शन केले. तसेच सध्याच्या परिस्थितीत खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाले आहे,अनेक किशोरवयीन मुली आणि मुलं प्रेमाच्या मोहमायामध्ये अटकत चालले आहे.
अशा मुला मुलींना समजूत घालण्यासाठी पालकांना खूपच कसरत करावी लागते पण शेवटी यश काय मिळत नाही, या प्रेम जावे मध्ये अनेक आजची तरुण पिढी गुन्हेगारी क्षेत्रामध्ये ओढले जात आहे. यावर कसे गाव स्तरावर उपाय करता येईल यावरही चर्चा यावेळी करण्यात आली. पुढे वेगवेगळ्या कायद्याविषयी माहिती सांगताना कदम अल्पवयीन मुलीला एखाद्या तरुण मुलाने साधा फोन नंबर सुद्धा मागितला आणि त्यावेळी त्या मुलीला लज्जास्पद वाटले तर अशावेळी पालकांच्या मदतीने त्या तरुणावर विनयभंग झाल्या असल्याकारणाने ३५४ कलम गुन्हा सुद्धा दाखल केला जातो.एखाद्या अल्पवयीन मुलीला प्रेमाची फूस लावून पळून नेले, तर अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला जातो. त्याचबरोबर बालविवाह प्रतिबंधक कायदा विषयी माहिती संतांना सांगितले की, मुलीचे १८ वर्षाचा आत आणि मुलाचे २१ वर्षाच्या विवाह करणे म्हणजेच बालविवाह करणे होय. बालविवाह कायद्याने गुन्हा आहे. बालविवाह मुळे कोणते दुष्परिणामाला सामोरे जावे लागतात याविषयी सविस्तर उपस्थित महिलांना कदम यांनी माहिती दिली.
त्याचबरोबर बालकांचे अधिकार, बालकांच्या समस्या, पालक सक्षमीकरण,तसेच बालसंगोपन सारख्या शासकीय शासकीय योजना बदल माहिती दिली. शेवटी सरपंच बोलताना सागितले की,शेंडी गाव बालविवाह मुक्त गाव करण्यासाठी पुढाकार आम्ही घेऊ. गावात बालकांची कोणतीही समस्या निर्माण झाली प्रथम उडान हेल्प लाईन वर संपर्क साधून आपली मदत घेऊ. आपल्या मार्गदर्शन खाली गावातील बाल संरक्षण समिती स्थापन करून त्या समितीला बालकांच्या संरक्षणासाठी सक्रिय ठेऊ. शेवटी सरपंच यांनी उडान टीमचे आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उडान प्रकल्पाचे सोशल वर्कर शाहिद शेख, पूजा झीने, शशिकांत शिंदे, सीमा जुनी, ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.