अहमदनगर जिल्ह्यात कृषी विभागाच्या भरारी पथकांकडून तब्बल ३५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित;१५ भरारी पथक ठेवणार वॉच जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे
अहमदनगर (दि.२६ जुन प्रतिनिधी):-हंगामाच्या सुरवातीपासून कृषी विभागाची नजर कृषी केंद्रांवर आहे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथक नेमून नजर ठेवली जात होती.अहमदनगर जिल्ह्यात भरारी पथकांकडून तपासणी करत त्रुटी आढळून आलेल्या एकूण ३५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली आहे.
जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडत आहे.जिल्ह्यात ठिकठिकाणी पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.बाजारपेठेत कपाशी,सोयाबीन,तुर यासह कडधान्य पिकांच्या बियाणांना मोठी मागणी आहे.यामुळे बियाणांचा काळाबाजार करत चढ्या दराने विक्री केली जात आहे.याबाबतच्या तक्रारी कृषी विभागाकडे देखील वाढल्या होत्या कृषी विभागाला प्राप्त तक्रारीनुसार आणि अचानक भेटीद्वारे कृषी विभाग कृषी केंद्राची तपासणी करण्यास सुरवात केली.कृषी विभागाच्या भरारी पथकांकडून तपासणी करत गेल्या महिनाभरात ३५ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
तसेच १३ पेक्षा अधिक केंद्रांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.यासह जिल्ह्यात २ ठिकाणी थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्याच प्रमाणे या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात १५ भरारी पथकाची स्थापना देखील करण्यात आली असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी यावेळी दिली.