घरात चोरी करायच्या उद्देशाने गेलेल्या तरुणास झाडाला बांधून बेदम मारहाण ५ जणांवर भिंगार कॅम्पमध्ये गुन्हा दाखल
अहमदनगर (दि.२६ जुलै प्रतिनिधी):-शहरातील मार्केटयार्ड शेजारील ओसरकर मळ्यात किरण अवसरकर यांच्या घरात चोरी करण्याचा उद्देशाने घरात गेल्याने पश्चिम बंगाल येथील राजू हिरा घोष या तरुणास ५ जणांनी पकडून घराजवळील झाडास हातापायाला दोरीने बांधून त्यास लाकडी दांडक्यांने लाथा बुक्क्यांनी पोटावर तोंडावर मारहाण केली.
व त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.यावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुरन ५६०/२०२४,भादवीक ३०७,३२६,३२४,३२३,३४२,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ/पांडुरंग बारगजे हे करीत आहेत.