अल्पवयीन मुलांना मारहाण करून धिंड काढणाऱ्या त्या ४ आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी
अहमदनगर (दि.२६ जुन प्रतिनिधी):-नवनागापूर येथील अल्पवयीन मुलांना व त्यांच्या घरच्यांना कुऱ्हाडीचा दांडा,कोयत्याने जबर मारहाण करून त्यांची धिंड काढणाऱ्या चार आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यामध्ये विशाल जालिंदर काटे,विशाल दीपक कापरे,हर्षद गौतम गायकवाड,प्रवीण शरद गीते यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.या गुन्ह्यात एकूण १३ आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून बाकी संशयीत आरोपी अद्यापही फरार आहेत.
पकडलेल्या चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली आहे.