Maharashtra247

नवी मुंबई गांधी हॉस्पिटल परळ येथील स्टाफ नर्स यांनी सातवे वेतन एरीएस मिळण्याबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घेतली भेट सहकार्य करण्याची केली विनंती

मुंबई (प्रतिनिधी):-नवी मुंबई येथील गांधी परळ हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून तब्बल ३६ वर्ष सर्विस केलेल्या सौ.हेलन जोसेफ काळे या ऑगस्ट २०१९ रोजी पदमुक्त झाल्या आहे.परंतु अद्यापही त्यांना व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांना एरीएसची रक्कम भेटली नाही.

दरम्यान काळे व त्यांच्या सहकारी कर्मचारी यांनी हॉस्पिटलचे सुप्रिडेंट व अधिकाऱ्यांमार्फत पाठपुरावा केला असता कायम त्यांना टाळाटाळ व दिशाभूल करण्याचे काम हॉस्पिटलवाले करत असल्याचा आरोप सर्व कर्मचाऱ्यांनी केला आहे.

जवळपास २० ते २५ स्टाफ नर्स या एरियस पासून वंचित आहेत.असे असताना सुद्धा इतर पदमुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एरियसचे चार हप्ते नियमित नियमित देण्यात आले आहे.सौ.हेलन जोसेफ काळे यांच्यासह जवळपास २० ते २५ स्टाफ नर्स यांनी राज्याचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद महाराष्ट्र राज्य मुंबई अध्यक्षा सौ.अनुजा (गायकवाड) साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे भेट घेत वंचित सर्व स्टाफ नर्स यांना सदरील हॉस्पिटल मधून सातव्या पे कमिशनचा लाभ मिळावा म्हणून सहकार्य करण्याची निवेदनाद्वारे विनंती केली.

You cannot copy content of this page