
अहमदनगर (दि.२९ जुन):-पाथर्डी परिसरात रस्तालुट करणारे 4 आरोपी 1 लाख 35,000/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

बातमीची हकीगत अशी की,दि.14 जुन 2024 रोजी यातील फिर्यादी श्री. ज्ञानदेव नारायण सुर्यवंशी (रा.कोकणगांव, ता.कर्जत) हे त्यांचे टाटा कंपनीचे टेम्पोमध्ये सफरचंद भरुन मिरजगांव ते पाथर्डी असे घेवुन जाताना माणिकदौंडी घाट,ता. पाथर्डी येथे अनोळखी 4 इसम मोटार सायकलवर येवुन फिर्यादीचे टेम्पोवर दगड फेकुन,टेम्पोला मोटार सायकल आडवी लावुन फिर्यादी व त्यांचे मित्रास चाकुचा धाक दाखवुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन खिशातील 22,000/- रुपये किंमतीचे विवो व ओप्पो कंपनीचे 2 मोबाईल फोन बळजबरी चोरुन नेले बाबत.पाथर्डी पो.स्टे.गु.र.नं. 616/2024 भादविक 394,341,34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हि घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना स्थागुशाचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नेमुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.स्थागुशा पथक गुन्हा दाखल झाल्यापासुन गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करुन, गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने आरोपींचा शोध घेत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत वर नमुद गुन्हा हा आरोपी नामे अक्षय डमाळे रा.शिरसाठ वाडी, ता.पाथर्डी याने त्याचे इतर साथीदारांनी केला असुन ते आता पाथर्डी ते धामणगांव देवी जाणारे रोडवर असलेल्या वनदेव डोंगरामध्ये रस्त्याचे कडेला बसलेले आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करता पाथर्डी ते धामगांव देवी जाणारे रोडवर असलेल्या वनदेवी डोंगराचे कडेला रस्त्यालगत एका मोटार सायकल जवळ 4 इसम बसलेले दिसले.
त्यावेळी पथकाची खात्री झाल्याने संशयीतांना अटकाव करुन पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे अक्षय अशोक डमाळे हल्ली रा.शिरसाठवाडी, ता. पाथर्डी मुळ रा. येळी,ता.पाथर्डी,रोहित ऊर्फ भैय्या रमेश कराळे,अभिषेक सिताराम पवार दोन्ही रा. धामणगांव, ता.पाथर्डी व विधीसंघर्षीत बालक असे असल्याचे सांगितले.ताब्यात घेतलेल्या इसमांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतील 1 ओप्पो,1 रेडमी,3 विवो कंपनीचे मोबाईल फोन व 1 शाईन मोटार सायकल मिळुन आली. त्याबाबत विचारपुस करता आरोपींनी त्यांचा साथीदार नामे सुधीर रावसाहेब कराळे (फरार),रा.धामणगांव, ता. पाथर्डी अशांनी मागिल 10 ते 15 दिवसापुर्वी मोटार सायकलवर जावुन माणिकदौंडी घाट, ता. पाथर्डी येथे टेम्पो आडवुन केलेल्या चोरीतील मोबाईल फोन असल्याचे सांगितल्याने आरोपींना ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपींकडे अधिक विचारपुस करता त्यांनी पाडळी शिवार, ता.पाथर्डी परिसरात काही दिवसांपुर्वी मोटार सायकल आडवुन इलेक्ट्रीक काटा व रोख रक्कम चोरी केल्याचे सांगितल्याने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 601/2024 भादविक 394, 341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.
ताब्यातील आरोपींचे अंगझडतील मिळुन आलेला 15,000/- रुपये किंमतीचा 1 ओप्पो,10,000/- रुपये किंमतीचा 1 रेडमी, 30,000/- रुपये किंमतीचे 3 विवो कंपनीचे मोबाईल फोन व 80,000/- रुपये किंमतीची 1 शाईन मोटार सायकल असा एकुण 1,35,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन पाथर्डी पो.स्टे.गु.र.नं. 616/2024 भादविक 394, 341,34 प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी हजर केले आहे.पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार पोउपनि/मनोहर शेजवळ व अंमलदार रविंद्र कर्डीले, सचिन अडबल,अतुल लोटके,देवेंद्र शेलार, संदीप चव्हाण,संतोष खैरे,फुरकान शेख, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड व अरुण मोरे पोलीस यांनी केलेली आहे.
