वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रवक्तेपदी अहमदनगर जिल्ह्यातील तिघांची वर्णी
अहमदनगर (दि.३० जुन प्रतिनिधी):-वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्तेपदी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील ॲड.अरूण जाधव,श्रीरामपूर तालुक्यातून दिशा पिंकी शेख तर अकोले तालुक्यातील उत्कर्षा रूपवते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी तसे प्रसिद्धी पत्रक काढले आहे. या पत्रकामध्ये एकूण त्यामधे ६ प्रवक्ते यांची नियुक्ती केली असून पक्षाचे उपाध्यक्ष सिध्दार्थ मोकळे यांची प्रमुख प्रवक्तेपदी पुनर्नियुक्ती केली आहे.