शेवगाव (प्रतिनिधी १ जुलै):-शेवगाव पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपींकडुन चोरीच्या तीन मोटार सायकल जप्त करुन आरोपीना ताब्यात घेऊन अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांना गुप्त बात्तमीदारामार्फत माहीती मिळाली की, शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत नेवासा रोडने तीन अनोळखी इसम यांचे कडे चोरीच्या मोटार सायकल असुन त्यांचे कडे कोणतेही कागदपत्र नाहित त्या मोटार सायकली चोरीच्या असुन त्या शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत आणल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली होती. सदर माहीतीच्या अनुषंगाने तात्काळ पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे आदेशाने पोलीस पथके रवाना झाली.तेव्हा नमुद ठिकाणी जावुन पाहिले असता तेथे तीन इसम हे वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकल घेवून उभे होते.
त्यांच्यावर छापा टाकला असता त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव जय काळूराम दारकुंडे (रा.बहिरवाडी ता.जि. अहमदनगर) तसेच २ विधी संघर्षीत बालक (रा. लवाघवाडी ता.जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगुन त्यांचे ताब्यात असलेल्या मोटार सायकलचे कागदपत्रा बाबत विचारपुस करुन मागणी केली असता त्यांनी सदर मोटारसायकल बाबत त्यांचे कडे कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगीतले.या तीन आरोपींचे ताब्यातुन एकुन ५५,०००/-रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपीविरुध्द शेवगाव पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं.५६०/२०२४ भादवि कलम महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२४ प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला,अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. श्री.दिगंबर भदाणे, पोहेकाँ/नाकाडे,पोना/ उमेश गायकवाड,पोना/ संदिप आव्हाड,पोकॉ/ शाम गुंजाळ,पोकॉ/ बप्पासाहेब धाकतोडे, पोकॉ/गर्कळ,पोकॉ/संपत खेडकर,पोकॉ/ संतोष वाघ,पोकाँ/राहुल खेडकर तसेच अहमदनगर जिल्हा दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोकॉ/राहुल गुंडू यांनी केली असुन पुढील तपास पोना/उमेश गायकवाड हे करत आहेत.