मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करताच ६७ हजार रुपये गायब;लहान मुलांना मोबाईल खेळायला देताना विचार करा..
अहमदनगर (दि.१ जुलै):-श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील अण्णासाहेब रोहोम यांनी मुलाला खेळण्यास मोबाईल दिल्याने मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहताना अचानक मोबाईलवर व्हिडीओ कॉल आला तो मुलांनी पाहिला.व यानंतर एक लिंक आली.
मुलांनी बटन दाबल्याने लिंक डाऊनलोड झाली. व्हिडीओ बंद झाल्याने मुलांनी वडिलांकडे पुन्हा मोबाईल दिला.त्यांच्या मोबाईलवर ओटीपीचे मेसेजसह क्रेडीट कार्डवरुन खरेदी केल्याचे मेसेज आले. ३०, ८९९ रुपये काढल्याचा पहिला, १८, ४९९ रुपये काढल्याचा दुसरा तर १० हजार रुपये काढल्याचा तिसरा मेसेज आला.
यानंतर मोबाईल हॅक झाल्याचे रोहम यांच्या लक्षात आले.त्यांनी तत्काळ अहमदनगर सायबर सेलशी संपर्क साधला असता याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांत तक्रार देण्याचे सांगण्यात आले.रोहोम यांनी श्रीरामपूर पोलिसात तक्रार दिली.दोन क्रेडीट कार्डवरून ६६,७४७ रुपये अज्ञात व्यक्तीने मोबाईल हॅक करून काढल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.