Maharashtra247

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचा कायद्याबाबत छान उपक्रम;नवीन फौजदारी कायद्यांची जनसामान्यात केली जनजागृती मोहीम

 

अहमदनगर (दि.१ जुलै):-१ जुलै २०२४ पासुन नवीन फौजदारी कायदयांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

तरी सर्व सामान्य जनतेस माहितीसाठी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी योगेश राजगुरु यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनी भिंगार येथे मुख्य बाजारपेठेतील कॅन्टोनमेंट शाळा,भिंगार वेस-ब्राम्हणगल्ली-नेहरु चौक-बेरड गल्ली-भिंगार वेस-गवळीवाडा-सदर बाजार-पोलीस स्टेशन येथे जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते.

 

यातून जनसामान्यांना नवीन कलमांची माहिती देण्यात आली व मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली.यावेळी कॅन्टोनमेंट शाळेचे श्री.संजय शिंदे सर,सामाजिक कार्यकर्ते श्री.उदध्व शिंदे,पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरडे,गोपनिय शाखेचे अजय गव्हाणे,पोहेकॉ/दीपक शिंदे व अंमलदार उपस्थित होते.

You cannot copy content of this page