वित्त विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये अहमदनगर कोषागार कार्यालयाची नेत्रदिपक कामगिरी
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१० जानेवारी):-वित्त विभागांतर्गत संचालनालय,लेखा व कोषागारे यांच्या नाशिक विभागांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच धुळे येथे उत्साहात पार पडल्या,या स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्हा कोषागाराने नेत्रदिपक कामगिरी करत विशेष प्राविण्याने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच जनरल चॅम्पियनशिपशी अहमदनगर कोषागाराने पटकावली.धुळे येथे झालेल्या दोन दिवसीय क्रिडा स्पर्धेत १०० मीटर,२०० मीटर धावणे, ४०० मीटर रिले,लांब उडी, गोळा फेक,थाळीफेक, स्विमिंग या वैयक्तिक कॅरम एकेरी,कॅरम दुहेरी,बुध्दीबळ मिश्र,टेबल टेनिस एकेरी आणि दुहेरी,बॅडमिंटन एकेरी आणि दुहेरी,खो-खो,क्रिकेट अशा क्रिडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात समुह नृत्य, समुह गाण,एकल गाणे, मिश्र गाणे,यांचे आयोजन करणेत आले होते.या स्पर्धेत नाशिक,धुळे,जळगाव, अहमदनगर व नंदुरबार या जिल्हयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला.अहमदनगर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी बजावली.यामध्ये १०० मीटर पुरुष श्री.अर्जुन शिरसाट (प्रथम),गोळा फेक श्री. विनोद काळे(प्रथम),थाळी फेक श्री.विनोद काळे(प्रथम), लांब उडी श्री.अर्जुन शिरसाट (प्रथम),लांब उडी (महिला) श्रीमती.उमाताई जाधव (प्रथम),टेबल टेनिस (महिला) श्रीमती.मनिषा म्याना (प्रथम), स्विमिंग (महिला) श्रीमती. उमाताई जाधव (प्रथम), सुत्रसंचालन श्री.योगेश वाघ (प्रथम) तसेच सांघिक स्पर्धामध्ये बॅडमिंटन दुहेरी श्री. शैलश मोरे व श्री.राहुल गांगर्डे (प्रथम),महिला खो-खो (प्रथम),४०० मीटर रिले पुरुष (प्रथम),समुहनृत्य (प्रथम), रांगोळी स्पर्धा श्री.अनंत कुलकर्णी,श्रीमती.कविता कोमार,श्रीमती.सुषमा हुडे, श्रीमती.मंगल बर्डे (प्रथम) क्रमांक पटकावून सुवर्ण पदक मिळवले.अहमदनगर जिल्हा कोषागार कार्यालयाने सांघिक विजेतेपदही पटकावले असुन या यशबद्दल वित्त विभागातील मान्यवर व अधिकाऱ्यांकडनू या कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.