श्री चौंडेश्वरी मातेचा रथयात्रा सोहळा भिंगारमध्ये उत्साहात संपन्न,सालाबाद प्रमाणे देवांग कोष्टी समाजाच्या वतीने आयोजन
अहमदनगर प्रतिनिधी दि.१० जानेवारी:-भिंगार शहरातील दाणे गल्ली येथील चौंडेश्वरी मंदिरात शाकंभरी नवरात्र व पौष पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये व भक्तिमय वातावरणात महोत्सव साजरा करण्यात आला,रथयात्राच्या दरम्यान भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे व कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष श्री.वसंत राठोड यांनी या चौंडेश्वरी मातेच्या रथयात्रेत सहभाग नोंदवला सर्व गोष्टी बांधवांना शाकंभरी नवरात्र उत्सव व पौष पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपा युवा मोर्चा भिंगार अध्यक्ष किशोर कटोरे,देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष शिवम भंडारी,एसबीसी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर फासे साहेब,श्री.विधाटे,श्री. कुमठेकर,समाजसेवक राहुल लिपारे,गजानन कांबळे,शिवकुमार वाघुंबरे,नंदू खटावकर,विनोद गोरे,संदीप टेके,इंजिनीयर अनिल सोळसे आदी यावेळी उपस्थित होते