Maharashtra247

चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी ५० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह जेरबंद;नाशिक वरून येऊन नगर जिल्ह्यात करायचा चैन स्नॅचिंग एलसीबीने लावला असा सापळा 

 

अहमदनगर (दि.२ जुलै प्रतिनिधी):-अहमदनगर शहर,संगमनेर व लोणी परिसरात चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी तब्बल 3 लाख 55,000/-रु. किंमतीच्या 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

बातमीची हकीगत अशी की,यातील फिर्यादी सौ.कल्पना राजेंद्र गांगुर्डे (रा. रेणावीकर नगर,भिडे चौक,अहमदनगर) या रस्त्याने पायी जात असतांना पाठीमागुन अनोळखी 2 इसम मोटार सायकलवर येवुन फिर्यादी जवळ थांबुन मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांना आडवुन धक्काबुक्की करुन गळ्यातील 70,000/-रुपये किंमतीचे सोन्याचे 25 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र ओढुन तोडून बळजबरीने चोरुन नेले बाबत.तोफखाना पो.स्टे. येथे गु.र.नं. 741/2024 भादविक 394,34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता.

चैन स्नॅचिंगची घटना घडल्या नंतर जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला साहेब स्थानिक गुन्हे शाखेची पोनि/श्री.दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन चैन स्नॅचिंग गुन्ह्यांचा समांतर तपास करुन,गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नेमुन चैन स्नॅचिंगचे गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींकडे तपास करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या. स्थागुशाचे पथक अहमदनगर शहर,संगमनेर व लोणी परिसरात झालेल्या चैन स्नॅचिंग घटना ठिकाणी भेट देवुन,सदर ठिकाणचे व आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज संकलीत केले.व त्या आधारे तपास करुन फुटेज मधील 1 इसम हा रेकॉर्डवरील आरोपी नामे विनोद पवार (रा.नाशिक) हा असल्याचे निष्पन्न झाले.

स्थागुशाचे पथक सदर आरोपीचा शोध घेत असतांना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत आरोपी विनोद पवार हा त्याचे साथीदारासह अहमदनगर शहरातील तारकपुर बसस्थानक येथे गेटजवळ उभा असुन त्याने अंगामध्ये राखाडी रंगाचा फुल बाहीचा शर्ट व काळसर रंगाची पॅन्ट घातलेली आहे.आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने प्राप्त माहिती पथकास देवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले. 

स्थागुशा पथकाने तारकपुर बसस्थानक अहमदनगर येथे जावुन पहाणी करता,तेथे बातमीतील वर्णनाप्रमाणे 1 संशयीत इसम दिसुन आला.त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन,त्याचे नाव गांव विचारता त्याने त्याचे नाव विनोद गंगाराम पवार (रा.सिडको झोपडपट्टी,भगतसिंग नगर,जिल्हा नाशिक) असे सांगितले.त्यास अहमदनगर येथे येण्याचे कारणाबाबत विचारपुस करता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याचा साथीदार नामे किशोर धोत्रे (रा.शांतीनगर, जिल्हा नाशिक) याचे सोबत मोटार सायकलवर येवुन जुन महिन्यात संगमनेर,लोणी व अहमदनगर शहरातील महिलांचे गळ्यातील मंगळसुत्र चोरी केल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेतले.आरोपीचा साथीदार नामे किशोर धोत्रे (फरार) नाशिक याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.

ताब्यातील आरोपी याचे कडे दाखल चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिन्या बाबत विचारपुस करता त्याने चोरी केलेले सोन्याचे मंगळसुत्र राहाता येथील सोनाराकडे विक्री केल्याचे सांगितल्याने सदर सोनाराचा शोध घेवुन तो मिळुन आल्याने त्याचेकडे चौकशी करता आरोपीने वडीलांचे गंभीर आजाराचे कारण सांगुन सोन्याचे दागिने माझेकडे देवुन त्या बदल्यात त्यास पैसे दिल्याचे सांगुन आरोपीने दिलेले सोने हजर केल्याने 1,06,500/- रुपये किंमतीचे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन, 1,06,500/- रुपये किंमतीचे 15 ग्रॅम वजनाचे मिनीगंठण, 71,000/- रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे गंठण, 71,000/- रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे गंठण असा एकुण 3,55,000/- रुपये किंमतीचे 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करुन आरोपीस मुद्देमालासह तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,श्री. अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/हेमंत थोरात व अंमलदार रविंद्र कर्डीले,दत्तात्रय गव्हाणे,सचिन अडबल, गणेश भिंगारदे,देवेंद्र शेलार,संतोष खैरे,अमृत आढाव,फुरकान शेख, मेघराज कोल्हे,चंद्रकांत कुसळकर यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page