Maharashtra247

अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याच्या प्रकरणातुन आरोपीची निर्दोष मुक्तता

 

अहमदनगर (दि.४ जुलै):-नगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या विकास जगदाळे याची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.आरोपीवर पीडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला व फोटो व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

जुन 2022 मध्ये नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला व फोटो व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल करून बदनामी केली.कॉलेजला जाताना चोरून पाठलाग करत असे.त्यानुसार पीडित महिलेने आरोप करून विकास जगदाळे या आरोपी विरुद्ध नगर तालुका पोलीस ठण्यात भारतीय दंड संहिता कलम 354 (D),500 of आणि कलम 11(4),(5),12of पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.त्यानुसार आरोपीला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली.

सदर गुन्ह्याचा संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.या खटल्यामध्ये सरकारी पक्षाने आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकामी साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या.त्यानुसार आरोपीतर्फे ॲड.विकास ढोकळे यांनी साक्षीदारांची उलट तपास घेतले.त्यामध्ये पीडीतेचा घेतलेला उलट तपास महत्त्वाचा ठरला. त्या अनुषंगाने साक्षीदारांचे घेतलेले उलटतपास व न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद व तपासातल्या त्रुटी विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती एम. एच.मोरे यांनी ग्राह्य धरून आरोपीची दि.3 जुलै 2024 रोजी निर्दोष मुक्तता केली.या खटल्यात ॲड.विकास ढोकळे,ॲड.प्रवीण तांबे,ॲड.तुषार कोतकर यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page