अहमदनगर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक निलंबित;जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले आदेश
अहमदनगर (दि.४ जुलै):-अहमदनगर जिल्ह्यात जामखेड तालूक्यातील वादग्रस्त शिक्षक विजय सुभाष जाधव प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा ता.जामखेड येथे कार्यरत असलेल्या शिक्षकाला जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अखेर जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे.
विजय सुभाष जाधव हे मोहा ता.जामखेड येथे कार्यरत असताना सन २०२३ -२४ चे वार्षिक तपासणी वेळी तपासणी असलेल्या विस्तार अधिकारी तसेच केंद्रप्रमुखांना धमकावणे, दमबाजी करणे,याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेस प्राप्त झाला होता.त्यामुळे जाधव यांनी जिल्हा सेवा (वर्तणूक ) नियम १९६७ मधील ३ चा भंग केल्या प्रकरणी त्यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
मात्र त्यांना निलंबन काळात गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती नेवासा हे मुख्यालय देण्यात आले आहे.यापूर्वीच सुभाष जाधव यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांची विभागीय चौकशी प्रास्तावित करण्यात आली आहे.अतिशय कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून आशिष येरेकर यांची जिल्ह्यात ओळख आहे.