ग्रामपंचायत कार्यालया समोर लाकडी दांडक्याने मारहाण करून एकाचा खून एमआयडीसीत गुन्हा दाखल
अहमदनगर (दि.४ जुलै):-नगर तालुक्यातील पांगरमल येथे शेळ्यांची चोरी करतो असे म्हणत चौघांना लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्याने मारहाण करून चांगदेव नामदेव चव्हाण या इसमाचा खून केल्याची घटना ४ जुलै २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
मयत चांगदेव चव्हाण यांच्या वहिनी शालिका रमेश चव्हाण (रा.पांगरमल ता. जि.अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात महादेव आव्हाड,सरपंच अमोल आव्हाड,उद्धव महादेव आव्हाड,आजिनाथ महादेव आव्हाड,गणेश अंबादास आव्हाड,संदीप पंढरीनाथ आव्हाड व गावातील इतर अनोळखी 20 ते 25 लोकांवर खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रॉसिटी व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने गावामध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण झाले आहे.अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.