युवकास मारहाण करून जिवे मारण्याची दिली धमकी चौघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल
अहमदनगर (दि.५ जुलै):-भिंगारच्या शुक्रवार बाजारात चौघांच्या टोळक्याने युवकाला शिवीगाळ करत मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि.२ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
यातील फिर्यादी यश सचिन भिंगारदिवे (रा.सदर बाजार,भिंगार) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे.त्याने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निग्रो (पूर्ण नाव नाही),शाहीद शेख, खुदाबक्ष (पूर्ण नाव नाही) व एक अनोळखी (सर्व रा.सदर बाजार, भिंगार) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस अंमलदार रवी टकले हे करत आहेत.