जिल्हाधिकारी कार्यालयाया समोर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू;गाई म्हशी आंदोलनामध्ये;खा. निलेश लंके बैलगाडीतून आंदोलन स्थळी दाखल
अहमदनगर (दि.५ जुन):-कांदा आणि दूध दरवाढीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार निलेश लंके यांच्यासह शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनआक्रोश मोर्चा काढला आहे.सकाळ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेला आहे.
यामध्ये शेतकऱ्यांची प्रामुख्याने मागणी होती की कांद्याला व दुधाला भाव मिळाला पाहिजे.तसेच या आंदोलनामध्ये खासदार निलेश लंके चक्क बैलगाडी मधून आले होते तसेच त्यांच्या सोबत शेतकऱ्यांनी गाया व म्हशी मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणल्या होत्या.
शेतकऱ्यांनी गाया व म्हशी डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांची व शेतकऱ्यांची व तसेच लंके समर्थकांची काही काळ तेथे हूज्जत झाली.या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती.