शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थिनीचा मृत्यू जिल्ह्यातील घटना
अहमदनगर (दि.६ जुलै):-शाळेत उशिरा आलेल्या विद्यार्थिनीला शिक्षकानी दिलेल्या शिक्षेमुळे विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली.मात्र यामुळे या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यातील पडेगाव येथील सारी नंबर ४५ जवळ असलेल्या शाळेत मयत तृप्ती तृप्ती दीपक भोसले (वय ९ ) वर्ष ही शाळेत उशिरा गेल्याने शाळेतील शिक्षक सुनील हांडे यांनी तृप्तीला वर्गा बाहेर उभे केले आणि तिच्या छातीला धक्का दिला ती पायऱ्यावरून खाली घसरून पडली यात ती गंभीररित्या जखमी झाली तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
विद्यार्थिनीची आई उमा दिपक भोसले यांनी मुलीचा मृत्यू हा शिक्षकांनी केलेल्या मारहाणीमुळे झालेला आहे अशी न्यायालयात तक्रार केली होती.या तक्रारी अर्जावरून न्यायालयाने शिक्षकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे कोपरगाव तालुक्यामध्ये एकच खळबळ उडालेली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.