Maharashtra247

व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यात येणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील तसेच खुल्या प्रवर्गातील मुलींनाही शंभर टक्के सूट मिळावी-इंजि.यश शहा

 

अहमदनगर (दि.८ जुलै):-अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते इंजि.यश प्रमोद शहा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्ष अ.भा.जैन दि.मंच,अल्पसंख्यांक समिती उपप्रमुख अ.भा.जैन श्वे.गुज.स.महा.यांनी मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व जिल्हाधिकारी यांना ई-मेलद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणात येणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील तसेच खुल्या प्रवर्गातील मुलींनाही शंभर टक्के सूट मिळावी उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन द्वारे घेण्यात आलेल्या शासन निर्णय क्र. शिष्यवृत्त-२०२४/प्र. क्र.१०५/तांशि-४ दि.०८ जुलै २०२४ यामध्ये समाविष्ट करावे व नवीन याबाबतचे परिपत्रक तात्काळ काढावे ही जैन अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने आग्रही विनंती केली.

यश शहा म्हणाले की जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात व्यापक संधी प्राप्त व्हाव्यात.तसेच महिला सक्षमीकरणा अंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब गंभीरतेने विचारात घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ई-मेल द्वारे केलेल्या मागणीचा योग्य तो विचार होऊन तात्काळ या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागांना तात्काळ द्यावेत जेणेकरून अल्पसंख्यांक समाजाच्या मुलींना व्यावसायिक शिक्षण घेण्यास सहकार्य मिळेल.इंजि.यश शहा नेहमीच अल्पसंख्यांक समाज बांधवांसाठी शासन दरबारी आपल्या मागण्या प्रभावीपणे मांडत असतात व समाजास न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात.

 

You cannot copy content of this page