Maharashtra247

घरफोडी करणारी गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली जेरबंद;६ लाख ६३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत

 

अहमदनगर (दि.९ जुलै):-जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यात घरफोडी करणारी गुन्हेगारांची टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींकडून सुमारे ६ लाख ६३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी ही माहिती दिली आहे.

लखन विजय काळे,गोरख हैनात भोसले,सोनाजी एकनाथ गर्जे,अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.ही कारवाई शेवगाव परिसरातील गेवराई रस्त्यावर करण्यात आली.शेवगांव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल होता. महादेव मुरलीधर मुंढे यांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी केली होती.चोरट्यांनी सुमारे १ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता.सदर आरोपी हे गेवराई रोडवर असल्याची माहिती पोलिसांना समजली होती.त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक व श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग शेवगांव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार भाऊसाहेब गोविंद काळे,रविंद्र कर्डीले,संतोष लोढे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, संतोष खैरे,अमृत आढाव,फुरकान शेख,प्रशांत राठोड,संभाजी कोतकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page