महास्कील टेक इनोव्हेटिव्ह फाऊंडेशन तर्फे श्री.मार्कडेय प्राथ व माध्य.विद्यालयात मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप;धनशक्ती पेक्षा दानशक्ती समाज बदल घडवेल-राहुल बांगर
अहमदनगर (दि.९ जुलै):-महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाऊंडेशन तर्फे श्रमिकनगर येथील श्री.मार्कडेय प्राथ.माध्य.विद्यालय व बालक मंदिर शाळेमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांना केवळ चांगली शाळा,शिक्षक मिळणे महत्वाचे नाही तर त्याच बरोबर शैक्षणिक साहित्य सुद्धा मिळणे महत्वाचे आहे. शासनाने मोफत पुस्तके सर्व शाळात पुरवली असली तरीही लिहिण्यासाठी वही आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना हजारो रुपये खर्च करावे लागतात आणि दुदैवाने काही विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य वेळेवर उपलब्ध होत नाही.
या समस्येला केंद्र मानून मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाची मोहीम या माध्यमातून सुरु करण्यात आली.प्रसंगी कर्तव्यम फाऊंडेशन आणि हेल्पिंग हँड्स फोर हंगर्स यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम घडवून आला त्या बद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे यांनी आभार मानले.समाजातील विषमता दूर करण्यासाठी दानशक्ती महत्त्वाची असून धनशक्ती पेक्षा दानशक्तीने समाजामध्ये मूलभूत परिवर्तन घडेल असा आशावाद प्रसंगी महास्किल संस्थेचे डायरेक्टर श्री.राहुल बांगर यांनी व्यक्त केला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभिजित चिंतामणी,अविनाश मुंडके,दिलीप गाडेकर, महेश पवार,कृष्णा आखमोडे आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळेस मार्कडेय विद्यामंदिरच्या प्राचार्य सौ.दगडे मॅडम व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग यांचे सहकार्य लाभले.याच प्रकारे अन्य शाळेत देखील असा उपक्रम होणार असून,या ज्ञान साहित्य वाटप मोहिमेत जोडण्यासाठी संस्थेच्या 9011193700 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.