रस्त्याच्या कामाची टक्केवारीची 20 हजारांची लाच घेतांना महिला सरपंच व क्लार्कवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१० जानेवारी):-यशस्वी सापळा अहवाल
▶️ *युनिट -* अहमदनगर
▶️ *तक्रारदार-* पुरुष वय- ३०,रा सोनेवाडी, ता- नगर, जि.अहमदनगर
▶️ *आरोपी* – .१) प्रियांका अजय लामखडे, वय ३५, सरपंच, निंबळक, ता- नगर, जि. अहमदनगर रा- निंबळक.
२) दत्ता वसंत धावडे, वय ४०, धंदा – नौकरी, लिपिक, ग्रामपंचायत निंबळक.
▶️ *लाचेची मागणी-* २००००/-₹
▶️ *लाचेची मागणी -* ता.१०/०१/२०२३
▶️ *लाच स्विकारली -* २००००/- ₹
▶️ *लाच स्विकारली दिनांक -* १०/०१/२०२३
▶️ *लाचेचे कारण* -.तक्रारदार हे कंत्राटदार असुन, त्यांनी निंबळक गावातील निंबळक लिंगतीर्थ रस्त्याचे मजबुती करण्याचे कामाचा ठेका जिल्हा परिषद अहमदनगर कडुन मिळाला होता.त्यांनी सदर रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करुन केलेल्या कामाचे बील ₹ १३६५०५६ मंजुरी साठी जिल्हापरिषद मध्ये सादर केले होते.सदर बिल मंजूर होऊन ग्रामपंचायत निंबळक यांचे बॅंक खात्यामध्ये जमा झाले होते. तक्रारदार यांना ₹ १२,३८,५५६ /- चा चेक सरपंच व ग्रामसेवक यांचे सहीचा मिळाला होता त्यावेळी सुद्धा आरोपी लोकसेवक क्रमांक १ यांनी तक्रारदार यांचेकडून पैसे घेतले नंतरच चेक वर सही केली होती.तक्रारदार यांचे बिलातील ₹ १,२६,०००/- रक्कम जीएसटी पोटी ग्रामपंचायतने राखुन ठेवली होती.तक्रारदार यांनी जीएसटी पुर्तता करुन,₹ १,२६,०००/- रकमेचा चेक ग्रामपंचायत निंबळकच्या ग्रामसेविका यांचे कडे मागणी केली असता,ग्रामसेविका यांनी चेक वर सही करुन चेक तयार ठेवला होता,परंतु सदर चेक वर सही करण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक क्रमांक १ यांनी तक्रारदार यांचेकडे ₹ २०,०००/- ची मागणी केली असल्याची तक्रार,तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे आज रोजी दिली.सदर तक्रारीचे अनुषंगाने आज रोजी निंबळक येथे लाच पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक क्रमांक १ व २ यांनी तक्रारदार यांचे कडे ₹ २०,०००/- मागणी करुन सदर रक्कम आरोपी लोकसेवक क्रमांक १ यांनी आरोपी लोकसेवक क्रमांक २ याचे कडे देण्यास सांगितले. रक्कम मिळाले नंतरच तक्रारदार यांचे बिलाचे चेक वर सही करेन असे आरोपी लोकसेवक क्रमांक १ यांनी सांगितलेचे स्पष्ट पणे निष्पन्न झाले.त्यावरून आज रोजी निंबळक ग्रामपंचायत समोर लाचेचा सापळा आयोजित केला असता आरोपी लोकसेवक क्रमांक २ याने तक्रारदार यांचे कडुन पंचा समक्ष ₹ २०,०००/- लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.पोलीस स्टेशन एम आय डी सी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ *सापळा अधिकारी*:- गहिनीनाथ गमे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी** हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर
▶ * *सहायक सापळा अधिकारी:-श्री.शरद गोरडे पोनि.ला.प्र.वि.अहमदनगर
सापळा पथक-पोलीस हवालदार संतोष शिंदे,विजय गंगुल,पोलीस अंमलदार,वैभव पांढरे,बाबासाहेब कराड,महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के,राधा खेमनर चालक हारून शेख,तागड
▶ **मार्गदर्शक* -*मा.शर्मिष्ठा घारगे- वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
▶मा. नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.
▶️ मा:- नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶ **आरोपीचे सक्षम अधिकारी -* मा. विभागीय आयुक्त, नाशिक.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
*@ टोल फ्रि क्रं. १०६४*