जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून तब्बल १ वर्षापासून फरार असलेल्या दोघांना तोफखाना पोलिसांनी पकडले
अहमदनगर (दि.१० जुलै):-तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत एकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून सुमारे एक वर्षापासून फरार असलेल्या दोन आरोपींना तोफखाना पोलीसांनी जेरबंद केले आहे.ताहेर महंमद शेख, वैभव संपत बारस्कर असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
हे दोघे तपोवन रोड येथे येणार असल्याची माहीती तोफखाना पोनि/श्री.आनंद कोकरे यांना मिळाल्याने पोनि/कोकरे यांनी तपास पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेण्यास सांगितले.पथकातील पोलीसांनी या दोन्ही आरोपींना तपोवन रोड येथे सापळा रचून ताब्यात घेतले.
सदरची कारवाई ही श्री.राकेश पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली तोफखाना पोनि/श्री. आंनद कोकरे यांच्या सुचणे नुसार सपोनी/श्री. जे सी.मुजावर,पोहेकॉ/ दत्तात्रय जपे,पोहेकॉं/ सुनिल शिरसाट,पोहेकॉ/ अहमद इनामदार,पोहेकॉ/सूधीर खाडे,पोहेकॉं/भानुदास खेडकर,पोहेकॉं/दिनेश मोरे,पोना/संदिप धामणे, पोना/वसीम पठाण, पोकॉं/सुमीत गवळी, पोकॉ/शिरीष तरटे,पोकॉं/दत्तात्रय कोतकर,पोकॉ/सतीष भवर,पोकॉ/ सतीष त्रिभूवन,पोकॉ बाळासाहेब भापसे यांनी केली आहे.