शहरातील मार्केटयार्कडे जाणाऱ्या रोडवर गोळीबार;नगर शहरात बंदूक येतायेत कुठून? कोतवाली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल
अहमदनगर (दि.१० जुलै):-नगर शहरातील माळीवाडा भागातून मार्केटयार्ड कडे जाणाऱ्या रोडवर सायंकाळी ५ ते ५.३० च्या सुमारास एका दुकानदारावर गोळीबार करण्याची घटना घडली आहे.मात्र त्या ठिकाणी असलेल्या एका डॉक्टर मुळे दुकानदाराचे प्राण वाचले.
डॉक्टरच्या एका जुन्या दवाखान्यातील सहायकाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे.मात्र ही गोळी बंदुकीतच अडकल्यामुळे पुढील अनर्थ टाळला.गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्टर आणि त्यांच्या सहायकांमध्ये काहीतरी विषयांवरून वाद सुरू होते याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनमध्येही त्या डॉक्टरने सहाय्यकविरुद्ध तक्रार केली होती.
मात्र आता सर्व विसरून चर्चेसाठी या अशी बोलणी करत एका दुकानात डॉक्टरला बोलवून चर्चा करत असताना मध्यस्थी करणाऱ्या दुकानदारावरच बंदूक रोखून फायर करण्याचा प्रयत्न झाला मात्र सुदैवाने शेजारी असल्यावर डॉक्टरने बंदूकधारी माणसाला ढकलून दिल्याने गोळी बंदुकीचा अडकल्याने पुढील अनर्थ टळला,कोतवाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र या प्रकाराने शहरात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून शहरात बंदूक नेमकी येतातच कुठून हा पण प्रश्न निर्माण झाला आहे.