Maharashtra247

हिवरगाव पावसा येथे नरभक्षक बिबट्याने घेतला बालिकेचा बळी;नरभक्षक बिबट्या पकडण्यासाठी तातडीने शोधमोहीम हाती घेण्याची ग्रामस्थांची मागणी

 

हिवरगाव पावसा (नितीनचंद्र भालेराव:- संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील गिन्नीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने आई जवळून उचलून नेले.सचिन शांताराम गडाख यांची पत्नी शेतात घासाची कापणी करत होती.आपल्या दीड वर्षाच्या मुलीला जवळ शेतात बसविले होते.त्यावेळी शेजारच्या गिन्नीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने आई जवळून उचलून नेले.

त्यामुळे सचिन शांताराम गडाख यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्यामुळे नातेवाईक,शेजारील नागरिक जमा झाले.वडील सचिन गडाख व चुलते गिन्नीच्या शेतात मुलीचा शोध घेऊ लागले.मुलीच्या चुलते यांनी ट्रक्टर फिरवला. त्यामुळे ट्रक्टरच्या आवाजाने बिबट्या जखमी बालिकेला सोडून पळाला.गंभीर जखमी बालिकेला हॉस्पिटल मध्ये नेले असता डॉक्टरांनी मयात घोषित केले.
सायंकाळी ५ वा.ओवी सचिन गडाख या बालिकेला गिन्नीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने आई जवळून उचलून नेले त्यामुळे ग्रामस्तांची वनविभागाचे अधिकारी यांना संपर्क केला.संगमनेर वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी येईपर्यत जखमी बालिकेला हॉस्पिटल मध्ये नेले.परंतु गंभीर जखमी बालिकेला डॉक्टरांनी मयात घोषित केले.

सहाय्यक वनसंरक्षक संदीप पाटील,वनपरिक्षेत्र अधिकारी संगमनेर भाग एक सचिन लोंढे, वनपाल चंदनापुरी नामदेव ताजणे,वनरक्षक विक्रांत बुरांडे,गजानन पवार व इतर कर्मचारी वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी हिवरगाव पावसा आले असता घटनास्थळी पाहणी केली.प्रवीण गडाख यांच्या घराशेजारील येथील गिन्नीच्या शेतात बालिकेचे रक्ताने भरलेले कपडे सापडले.सदर नरभक्षक बिबट्याला पकडण्यसाठी सहाय्यक वनसंरक्षक संदीप पाटील,वनपरिक्षेत्र अधिकारी संगमनेर भाग एक सचिन लोंढे,पिंजरे लावण्याचे आदेश दिले.नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला.परिसरात वन विभागाची रेस्क्यू टिम नरभक्षक बिबट्याचा पदमार्क,ठसे यांच्या अधारे शोध घेतला जात आहे.

हिवरगाव पावसा गावात भर वस्तीत येऊन बिबट्याने बालिकेला मारल्याची गंभीर घटना आहे.वनविभागाला अनेक वेळा पिंजर लावून परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेक वेळा केली होती.परंतु वनविभागाने गांभीर्याने न घेतल्याने हि अनुचीत घटना घडली आहे. येत्या काही दिवसां पूर्वी सदरच्या नरभक्षक बिबट्याने रायतेवाडी व हिवरगाव पावसा परिसरात मनुष्यांवर आणि प्राण्यावर हल्ले केले आहे.नरभक्षक बिबट्याला तत्काळ पकडण्यसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी हिवरगाव पावसा ग्रामस्तांनी केली आहे.

You cannot copy content of this page