Maharashtra247

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी;विजयी उमेदवार 

 

मुंबई प्रतिनिधी:-विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात होते.विजयासाठी २३ मतांची उमेदवारांना गरज होती.भाजपच्या पंकजा मुंडे,सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर,परिणय फुके आणि अमित गोरखे यांना प्रत्येकी २६ मते मिळाली.

शिवसेनेच्या शिंदे गटातील भावना गवळी यांनी २४ तर कृपाल तुमाने यांना २५ मते मिळाली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या राजेश विटेकर यांना २३ तर शिवाजीराव गर्जे यांना २४ मते मिळाली.महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या २५ मतांनी विजयी झाल्या तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर २४ मतांनी विजयी झाले. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना १२ मते मिळाल्याने ते पराभूत झाले.

You cannot copy content of this page