शहरातील कायनेटिक चौकात कोयता गँगचा धुमाकूळ
अहमदनगर (दि.१३ जुलै):-नगर शहरातील कायनेटिक चौक रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांवर दहशत निर्माण होईल अशा उद्देशाने चार ते पाच इसम धारदार कोयते हातात घेऊन फिरत असताना कोतवाली पोलिस ठाण्याचे कर्मचारी योगेश भिंगारदिवे,गणेश धोत्रे व त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्यांना ताब्यात घेतले.
व पोहेकॉ/योगेश भिंगारदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम कायदा कलम ४ चे उल्लंघन २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नगर शहरात कोयता गँग व त्याची दहशत आता नगरकराना आजच्या घटनेने पाहायला मिळाली.या गँगने नगर पुणे रोडवरील कायनेटिक चौक येथे रात्रीच्या सुमारास आले असता त्यांनी तेथे असणाऱ्या चहाच्या टपऱ्या पाडून दिल्या.आरडाओरड करत नासधूस केली असे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.अधिक तपास पोना/साठे हे करीत आहे.