नगर शहरातील गुन्हेगार पार्श्वभूमी असलेले ४६९ जण तडीपार पोलिसांकडून कारवाई
अहमदनगर (दि.१५ जुलै):-अहमदनगर शहरात १६ व १७ जुलै रोजी मोहरम निमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.व १७ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार असून त्यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी खबरदारी म्हणून नगर शहर पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर कारवाया सुरू केल्या आहेत.शहरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल,तणाव निर्माण होईल,अशा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.
त्याचीच खबरदारी म्हणून नगर शहर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक श्री.अमोल भारती यांच्या कार्यक्षेत्रात येणार्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत १००,तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतून १८० व भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १८९ अशा एकूण ४६९ जणांना १६ व १७ जुलै अशा दोन दिवसांसाठी शहरातून तडीपार करण्यात आले आहे.भारतीय नागरी संरक्षण कायदा कलम १६२ (२) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.