लग्न समारंभात बॅग,पर्स चोरी करणाऱ्या भामट्यास रोख रकमेसह पकडले स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर (दि.१५ जुलै):-लग्न समारंभात बॅग,पर्स चोरी करणाऱ्या अल्पवयीन आरोपीस रोख रकमेसह ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की ३ जुलै २०२४ रोजी यातील फिर्यादी श्री.किसनलाल बाबुलाल कोठारी (वय ५२,रा.बोलठाण,ता. नांदगांव,जिल्हा नाशिक) यांचे सिल्व्हर ओक लॉन्स,शिर्डी,ता.राहाता येथील रिसेप्शना वेळी फिर्यादी यांची पुतणी हिच्या हातातील पर्स बाजुला ठेवुन फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेल्या त्यावेळी एक अनोळखी मुलाने फिर्यादी यांचे पुतणीची ८ लाख ५० हजार /-रोख रक्कम असलेली बॅग चोरुन नेलेबाबत शिर्डी पो.स्टे. येथे गु.र.नं. ३९२/२४ भारतीय न्याय संहिता क.३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवुन, गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नेमुण वर नमुद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथक रवाना केले.स्थागुशा पथकाने सिल्व्हर ओक लॉन्स, शिर्डी,ता.राहाता येथील आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले.तसेच रिसेप्शन वेळी कार्यक्रमाचे व्हिडीओ शुटींग व फोटो ग्राफर यांचे कडील व्हिडीओ शुटींग व फोटो तपासले असता एक गो-या रंगाचा मुलगा बॅग उचलुन घेवुन जातांना दिसुन आला. पथकाने सदरचे फुटेज सोशल मिडीया व्दारे तसेच गुप्तबातमीदारांना पाठविले होते.पथक १३ जुलै २०२४ रोजी संशयीत मुलाचा शोध घेत असतांना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की शिर्डी येथील लग्न समारंभामध्ये चोरी करणारा गो-या रंगाचा व अंगामध्ये राखाडी रंगाचा नक्षीकाम असलेला शर्ट घातलेला मुलगा पाठीवर बॅग घेवुन नगर शहरातील पत्रकार चौकाकडुन तारकपुर बस स्थानकाकाडे पायी जात आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच तारकपुर रस्त्याने जावुन पहाणी केली असता एक १४ ते १५ वर्षे वयाचा गो-या रंगाचा पाठीवर बॅग घेतलेला व रस्त्याने पायी चाललेला मुलगा दिसला.
त्यास थांबवुन त्याचे कडे चौकशी केली असता तो अल्पवयीन (विधीसंघर्षीत) असल्याचे निष्पन्न झाले. सदर अल्पवयीन मुलाची पंचा समक्ष झडती घेता त्याचे झडतीमध्ये रोख रक्कम मिळुन आली. सदर रोख रकमे बाबत त्याचे कडे विचारपुस केली असता त्याने मागिल १० ते १२ दिवसांपुर्वी शिर्डी येथील लग्नातुन चोरी केलेल्या बॅगेतील रोख रक्कम असल्याचे सांगितल्याने सदर विधीसंघर्षीत बालकास ४५ हजार रुपये रोख रकमेसह ताब्यात घेवुन शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास शिर्डी पो.स्टे. करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात, अंमलदार संदीप पवार, रविंद्र कर्डीले,गणेश भिंगारदे,संदीप दरंदले, फुरकान शेख,सागर ससाणे,अमृत आढाव, अरुण मोरे यांनी केलेली आहे.