Maharashtra247

ओळखीचा गैरफायदा घेत पतीला चॅटिंग पाठविण्याची धमकी देत एकाचा विवाहितेवर वारंवार अत्याचार एमआयडीसी गुन्हा दाखल

 

अहमदनगर (दि.१९ जुलै):-नगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या पीडित विवाहितेला तिच्या सोबत केलेली चॅटिंग पतीला पाठविण्याची व आत्महत्या करण्याची धमकी देत युवकाने विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी १७ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्या युवकाविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हेमंत अशोक सैनी (रा.भोर कॉलनी, बोल्हेगाव फाटा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

पीडित महिलेसोबत हेमंत सैनी याची ओळख होती.ओळखीतून त्यांच्यात सोशल मीडियावर चॅटिंग सुरू होते.दरम्यान,त्यांनी केलेले चॅटिंग पतीला पाठविण्याची तसेच स्व:ता आत्महत्या करण्याची धमकी देत विवाहिता घरी एकटी असताना तिच्यावर बळजबरीने शारिरीक संबंध ठेऊन त्याने अत्याचार केला.अधिक तपास पोलीस करीत आहे.

You cannot copy content of this page