अहमदनगर (दि.१९ जुलै):-ध्येय मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या कंपनीतील चेअरमन,व्हाईस चेअरमन व संचालकांनी यातील ठेवीदार व गुंतवणुकदार यांना ज्यादा व्याजाचे आमिष दाखवुन त्यांना मल्टीनिधी/कंपनी पिग्मी डिपॉजिट खाते,फिक्स डिपॉजिट खाते,वैयक्तीक बचत खाते,सदस्य रिकरींग खाते, वैयक्तीक सिक्युरिटी डिपॉजिट खाते,एफ.डी खात्यामध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडुन गुंतवणुकदारांनी गुंतवणुक केलेल्या रककमेची मुदत पुर्ती नंतर तिचा परतावा न देता अफरातफर करुन आर्थिक फसवणुक केली आहे.
वगैरे फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु.रक्र. ६१३/२०२४ भा.द.वि.क.४२०,४०९,४०६,३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियिम (वित्तीय आस्थापना) १९९९ (MPD)चे कलम ३ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन सदर गुन्हयाचा तपास तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे हे करीत आहेत.
तरी सदर मल्टीनिधी कंपनीचे वरील प्रमाणे व अहमदनगर जिल्हयात इतर कंपनीत गुंतवणुक केलेल्या साक्षीदार गुंतवरणुकदार यांनी त्यांचे कड़े असलेल्या गुंतवणुकी बाबतचे कागदपत्रासह सदर गुन्हयाचे तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन अहमदनगर येथे संपर्क साधावा असे अवाहन केले आहे.