अहमदनगर (दि.१९ जुलै):-नेवासा शहरातील कै.सौ.बदामबाई धनराज शेठ गांधी विद्या मंदिर, आणि ज्ञानोदय कन्या विद्यालय मधील ७०० पेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि सामजिक संस्था यांच्या माध्यमातून स्नेहालय उडान प्रकल्प, अहमदनगर यांच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधक पदयात्रा काढण्यात आली होती.
ही पदयात्रा शहरातील मुख्य बसस्थानक, नगरपंचायत चौक, ज्ञानेश्वर मंदिर पुन्हा बस स्थानक अशी पदयात्रा काढण्यात आली. अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा करण्याचे ध्येय समोर ठेवून स्नेहालय संचलित उडान प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक जनजागृती आणि पुनर्वसन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.या पदयात्रेत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी बालविवाह प्रतिबंधक घोषणाबाजी देत बालविवाह रोखण्यासाठी निर्धार केला.पदयात्रेच्या समारोप प्रसंगी प्रमुख मनोगत व्यक्त करतांना नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले की,स्नेहालय उडानने प्रकल्प हा जनजागृती कार्यक्रम आयोजित केला.या बालविवाह कायद्याची जागृती निर्माण व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असतात.बालविवाह हा मुलांच्या अधिकारांचे उल्लंघन आहे.
बालविवाह झालेल्या मुलींचा शारिरीक विकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत १८ वर्ष गाठायच्या आतच त्यांना गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर,मन, घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण…या सऱ्यांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्या खेरीज राहत नाहीत.लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकते विषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते.कुटुंब नियोजन, गर्भधारणा आणि गर्भारपणात घ्यायची काळजी हे तर फारच दूरचे विषय असतात. बालविवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच पण आजच्या काळात हे असे घडणे म्हणजेच मागासलेपणाचे लक्षण आहे.मुलीचे १८ वर्षाची आतील मुलीचे आणि २१ वर्षाच्या आतील मुलाचे लग्न लावले असेल तर मुली व मुलाचे आई वडील,नातेवाईक, लग्न जमावणारे,लग्न लावणारे,भटजी, मंडपवाले,आचारी लग्नात उपस्थित राहून मदत करणारे,असे सर्वांवर गुन्हे दाखल होतात.त्याच बरोबर आयुष्यात कोणताही स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण जिद्द चिकाटी,आणि शिस्त ठेवून आपल्या शिक्षकांचा आदर ठेवा.
आपल्या सर्वांना जे आयुष्यात बनायचे आहे ते नक्कीच तुम्ही बनवू शकतात.नेवासा तालुक्यातील कोठेही बालविवाह होत असल्याचे खात्री असेल तर ताबडतोब आपत्कालीन हेल्पलाईन ११२ व बालकांच्या चाईल्ड हेल्प लाईन १०९८ वर संपर्क साधावा.आपले नावाची गोपनीयता ठेवली जाईल.त्यामुळे न संकोच पणे माहिती द्यावी. पोलीस आपल्या सुरक्षेसाठी आहे असेही यावेळी उपस्थित विद्यार्थी शिक्षक आणि नागरिकांना जाधव यांनी आवाहन केले. त्याच बरोबर उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी स्नेहालय संस्था व उडान प्रकलपा बद्दल माहिती देऊन कार्यक्रमाची प्रस्तावना सुद्धा केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा झिने यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी आभार कदम यांनी मानले.हा बालविवाह प्रतिबंधक जागृती पदयात्रा यशस्वी करण्याकरिता ज्ञानोदय इंग्लिश मीडियम स्कूल,श्री.ढेरे सर बदाम बाई गांधी विद्यामंदिर, श्री.संजय चौधरी सर तसेच या शाळेचे शिक्षक वर्ग,सत्यमेव जयते प्रतिष्ठानचे ॲड.जैद शेख नेवासकर,ज्ञानेश्वर मंदिर व्यवस्थापक श्री.भैया कावरे,डॉ.महेश मापारी,उडान प्रकल्पाचे सोशल वर्कर शाहिद शेख,स्वयंसेवक समीर, यांचे प्रमुख सहकार्य मिळाले.
पूजा झिने-सोशल वर्कर उडान प्रकल्प,स्नेहालय,अहमदनगर,मो.9011026495