मिस वर्धा सेकंड रनरअपचा मुकूट सामीया नौशाद अलीच्या नावावर
वर्धा प्रतिनिधी/शिवानी सुरकार (दि.१२जानेवारी):-११ जानेवारी २०२३ टीम जेनिथ इंडिया प्रेसेंट दी फेम जूनियर मीस वर्धा ग्रँड फिनाले स्पर्धा सौ.शितलराज बघेल यांनी राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते.दि.७ जानेवारी २०२३ ला टॅलेंट राऊंड हा पार पडला तर ८ जानेवारी २०२३ ला राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधानमंत्री वैद्य सर तसेच बजरंग दलाचे विदर्भ अध्यक्ष यांनी याचे अध्यक्षपद भूषविले,जेनेत अध्यक्ष मिथिल कळंबे,राष्ट्रीय महिला परिषद तालुका अध्यक्ष मंजूताई पाठक यांनी पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली.या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून अंजली इंगळे, मिस्टर इंडिया शुभम गोविंदवार आणि ऍक्टर कोरिओग्राफर नितीन मनोहर यांची उपस्थिती होती.यामध्ये सेंट अँथोनी स्कूलची इयत्ता तिसरी मध्ये शिकणारी सामीया अली सेकंड रनरअप तर काजल जयस्वाल रा.सेलू ही विजेता ठरली.या यशाचे श्रेय सामियाने आपले वडील नौशाद अली तसेच आई ॲड. जास्मिन अली यांना दिले तसेच तीम येथील इंडिया यांचे मनापासून धन्यवाद मानले.