अहमदनगर प्रतिनिधी (दि.11 जानेवारी):-विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दैनिक नगर स्वतंत्रचे संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे यांनी बुधवारी (दि.११) उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे उमेदवारी अर्ज केला. गुरुवारी (दि.12) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत 100 जणांनी अर्ज नेले होते.चिंधे यांनी बुधवारी दुपारी अर्ज दाखल केला. यावेळी प्राध्यापक संजय शेवाळे,शेखर भाऊ अंधारे, सुभाष मुदळ आदी उपस्थित होते.गत काही महिन्यांपासून चिंधे यांनी पदवीधर निवडणुकीची तयारी चालवली आहे. यापूर्वी शिंदे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदाची निवडणूकही लढविली आहे. चिंधे हे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असतात. पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठीही त्यांनी नेहमी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही गेल्या तीन वर्षापासून काम करत आहेत. शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी आग्रही राहिले आहेत. शिक्षकांच्या मुंबई येथे झालेल्या आंदोलनात वेळी झालेले आक्रमक भाषण आजही अनेक शिक्षकांच्या स्मरणात आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर चिंधे म्हणाले की आपण पदवीधरांच्या आणि शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी या निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. या निवडणुकीसाठी गत काही दिवसांपासून मतदार असलेल्या पाचही जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने अद्यापपर्यंत उमेदवारी जाहीर केलेले नाही. त्याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, आणि जळगाव असे पाच जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या पदवीधर निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. अहमदनगर जिल्ह्यातून बुधवारी दुपारपर्यंत केवळ चिंधे यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
Trending Topics:
Trending
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
- रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची सुभेदारी विश्रामगृह येथे चिंतन बैठक संपन्न;संघटनात्मक बांधणीसह ऑक्टोबरमधील मेळाव्यावर भर!
- ‘त्या’ काळ्या स्कॉर्पिओवर पोलिसांचा छापा लाखोंची नामांकित दारू जप्त..अहिल्यानगर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह?
