नगर प्रतिनिधी (दि.१३ जानेवारी):-नगर शहरातील केडगाव उपनगरातील तलाठी कार्यालयाचे 80 ते 90% कामकाज नगर सिटी सर्वेकडे वर्ग करण्यात आले आहे.परंतु कुठल्याही प्रकारचे काम सिटी सर्वे विभागातून होत नसल्यामुळे केडगाव येथील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.दहा दिवसांचा कालावधी असलेल्या कामासाठी दीड वर्षापासून नागरिक हेलपाटे मारत आहेत.तलाठी ऑफिसमध्ये देखील कुठल्याही प्रकारचे काम होत नाही.तसेच सिटी सर्व्हे ऑफिसमध्ये देखील कुठल्याही प्रकारचे काम होत नाहीत.तातडीची मोजणी करण्यासाठी लागणारे शुल्क भरूनही सात ते आठ महिन्यांपासून मोजणी होत नाही.यात वारस नोंद, सातबारा उतारे,फेरफार, जुने रेकॉर्ड,आदेश प्रत,मोजणी नकाशे,मोजणीकाम क्षेत्रातील त्रुटी,पोट हिस्से, टिपणी नकाशे /रेकॉर्ड अशी अनेक कामे सिटीसर्वे कार्यालयाच्या अंतर्गत येतात परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारल्यास पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे ही कामे करण्यास उशीर होतो.अशी कारणे दिली जातात एका सर्व्हेअर कडे 16/18 गाव आहेत.त्यामुळे प्रत्येक कामास कार्यालयीन वेळेपेक्षा दहापट जास्त वेळ लागतो.तरी कर्मचाऱ्यांची भरती करणे हे शासनाचे काम असुन कर्मचारी भरती तातडीने करावी व जनतेचा त्रास कमी करावा.अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.केडगाव उपनगर हे झपाट्याने वाढत आहे,परंतु तलाठी कार्यालयातून कागदपत्रे मिळत नसल्याने खरेदीची कामे रखडतात.हा केडगावच्या विकासासाठी अडथळा आहे.त्याचप्रमाणे दर्शवलेल्या कामासाठी लागणाऱ्या कालावधीचा तक्ता कार्यालयाच्या आवारात लावून त्याप्रमाणेच काम वेळेत व्हावीत हे बंधनकारक करण्यात यावे.नाहीतर दिनांक 25 जानेवारी पर्यंत सदर सर्व मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा पीडित नागरिकांना सोबत घेऊन दिनांक 26 जानेवारी पासून सिटीसर्वे कार्यालयाच्या दारात आमरण उपोषण करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांनी दिला आहे.
