अहमदनगर प्रतिनिधी दि.१४ जानेवारी):-पोलीस शिपाई पदासाठी अहमदनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणी सुरू आहे.शुक्रवार दि.१३ व शनिवार दि.१४ अशी दोन दिवस मुलींसाठी मैदानी चाचणी घेतली जात आहे. शुक्रवारी 737 मुली मैदानी चाचणी देण्यासाठी आल्या होत्या.त्यातील 119 अपात्र ठरल्या असून 618 मुलींनी मैदानी चाचणी दिली.दरम्यान 263 मुली चाचणीसाठी गैरहजर राहिल्या असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.नगर जिल्ह्यातील पोलीस शिपाई, चालक पदाच्या 139 जागेसाठी 2 जानेवारीपासून मैदानी चाचणीला सुरूवात झाली आहे.गुरूवार 12 जानेवारीपर्यंत मुलांसाठी मैदानी चाचणी घेण्यात आली. एकुण पाच हजार 48 मुलांनी चाचणी दिली.शुक्रवार,13 जानेवारी रोजी एक हजार मुलींना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. त्यापैकी 263 मुलींनी दांडी मारली तर 737 मुलींनी हजेरी लावली.पहाटे पाच वाजता मैदानी चाचणीला सुरूवात झाली.119 मुलींना अपात्र ठरविण्यात आले. 618 मुलींनी चाचणी दिली. गोळा फेक,100 मीटर धावणे, 800 मीटर धावणे अशा पध्दतीने चाचणी घेण्यात आली. आज (शनिवार) मैदानी चाचणीचा शेवटा दिवस असून 1014 मुलींना चाचणीसाठी बोलविण्यात आले असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Trending Topics:
Trending
- प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
- निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
- मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
- अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
- प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
- अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
- अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
- “जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”
