अहमदनगर (दि.२६ प्रतिनिधी):-कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे सत्र थांबता थांबेनात त्यातच २६ ऑगस्ट रोजी पहाटे ४ बंद घरे चोरट्यांनी फोडली आहेत.
या घरांच्या खिडक्यांचे डायरेक्ट गज तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोऱ्या केल्या आहेत.हे चोरटे एका चारचाकी वाहनातून आले होते.व डोक्यात माकड टोप्या घालून आले होर,परंतु पोलिसांना याचा थांगपत्ताच नाही.एकाच रात्रीत ४ ठिकाणी चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.एक प्रकारे चोरट्यांनी पोलिसांना आव्हान निर्माण केले आहे.पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे व हद्दीत चोऱ्यांना आळा कसा बसेल याची उपाय योजना आखली पाहिजे.
या हद्दीतील आगरकर मळा परिसरात राहणारे बेल्हेकर यांच्या घराच्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत उचकापाचक केली.त्यानंतर त्याच पद्धतीने तेथून जवळच असलेल्या विशाल कॉलनीत गोहाड,व्यवहारे व आव्हाड यांची ३ घरे चोरट्यांनी फोडली आहेत.वारंवार होणाऱ्या अशा चोऱ्यांनी नागरिक त्रस्त झाले असून रात्रीची पोलिस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी व स्थानिक नगरसेवकांनी केली आहे.