संगमनेर (दत्तात्रय घोलप):- संगमनेर तालुक्यातील लोणी-नांदूर शिंगोटे हायवे वरील पिंपळे गावा नजीक असणाऱ्या पुलावरील संरक्षक कठडे तुटले होते यामुळे येथे अपघात होण्याची दाट शक्यता होती.
या नादुरुस्त पुलाची पाहणी रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप,सामाजिक कार्यकर्ते पांडूरंग फड,संतोष शेळके यांनी केली होती व या बाबत तीव्र संताप व्यक्त केला.
तात्काळ या परिस्थितीचा आढावा घेत विविध वृत्तवाहिनी,वृत्तपत्राद्वारे 11 ऑगस्ट 2024 रोजी याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.संबंधित राष्ट्रीय महामार्ग जळगाव कडून विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दुरुस्तीसाठी तात्काळ पाठपुरावा करण्यात आला.याची तात्काळ दखल घेत नगर येथील एन.एच.ए.आयचे (NHAI)टेक्निकल मॅनेजर अनिल गोरड यांनी तात्काळ हे काम मार्गी लावून संरक्षक कठडे बसवण्याच्या कामास प्रारंभ केला.सध्या हे काम प्रगतीपथावर आहे.लवकरच हे कम पुर्ण होणार असल्याची महिती पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी दिली आहे.पाऊस संपल्यानंतर महामार्गावरील खड्डेंची दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती अनिल गोरड यांनी दिली.