Maharashtra247

‘भाग्य लक्ष्मी मल्टिस्टेट’ मध्ये घोटाळा पाईपलाईनरोड येथील शाखेला कुलुप 

 

अहमदनगर (दि.२७ ऑगस्ट):-पाईपलाईन रोड जवळील भिस्तबाग चौक येथे सुरु असलेल्या ‘भाग्य लक्ष्मी मल्टिस्टेट’ या वित्तीय संस्थेच्या आर्थिक कारभार चव्हाट्यावर आला आहे.

या मल्टीस्टेटच्या अहमदनगर जिल्ह्यात भरपूर शाखा आहेत.परंतु मल्टीस्टेटचे चेअरमन भारत बबन पुंड (रा.बेलपिंपळगाव,ता. नेवासा,जि.अहमदनगर) यांच्यात आणि ठेवीदारांमध्ये दोन तीन दिवसांपासून चांगलीच धुमश्चक्री सुरु होती.

त्यातून भाग्य लक्ष्मी मल्टिस्टेट या वित्तीय संस्थेच्या आर्थिक गडबडी चर्चेत आल्या आणि या संस्थेत कोट्यवधी रुपयांच्या ठेवी ठेवणाऱ्या ठेवीदारांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या संस्थेच्या पाईपलाईनरोड येथील कार्यालयास दि.२६ ऑगस्ट रोजी कुलूप लावलेले आहे.या मल्टीस्टेट मध्ये आर्थिक घोटाळा झाल्यामुळे ठेवीदारांनी पाईपलाईनरोड येथील शाखेत पैसे काढण्यासाठी गर्दी केली आहे परंतु तेथे कुलूप असल्यामुळे लोकांच्या निराशा होत आहे यामुळे ठेवीदार संतप्त झालेले आहे.

You cannot copy content of this page