सावेडी उपनगरात एकाचा खून छोट्या भावाने मोठ्या भावाचा केला घात आरोपी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात
अहमदनगर (दि.२७ प्रतिनिधी):-नगर शहरातील सावेडी उपनगर भागातील सपकाळ चौक येथे छोट्या भावाने मोठया भावाचा खून केला असल्याची माहिती सामोर आली आहे.
मयत सोपान मूळे व आरोपी शुभम उर्फ बांड्या मुळे या दोघा भावात रात्री जोरदार भांडणं झाली होती आरोपी शुभम उर्फ बांड्या मुळे याने त्याच्या भावाचा डोक्यात धारदार शास्त्राने हल्ला केला यात सोपान मूळे जखमी झाला त्याला उपचासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र सोपान मुळे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरानी सांगितले.अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.परंतु घटनास्थळी तात्काळ तोफखाना पोलिसांनी धाव घेत आरोपी शुभम उर्फ बांड्या मुळे ह्यास ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.