Maharashtra247

पुण्यातील अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आरोपी ताब्यात

 

अहमदनगर (दि.२७ प्रतिनिधी):-पुणे जिल्ह्यातून फुस लावुन पळवुन आणलेल्या मुलीची एमआयडीसी पोलिसांनी सुटका करून आरोपीस पकडून पुणे पोलीसांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती सपोनी/माणिक चौधरी यांनी दिली.

दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/माणिक चौधरी यांना दुध डेअरी चौक,एमआयडीसी हृदीत एक इसम आपल्या सोबत एका अल्पवयीन मुलीला पुण्यातून पळवून घेऊन आले असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.सपोनि/ चौधरी यांनी तात्काळ पोलीस स्टेशनचे नाईट बीट मार्शल डयूटीस असलेल्या अंमलदार यांना माहीती कळवून खात्री करण्यास सांगितले.

पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे एक इसम व एक मुलगी मिळून आले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुभाष पवार वय ४२ वर्षे असे सांगितले मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री झाल्यानंतर पुणे येथिल ते राहत असलेल्या बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे खात्री केली असता त्यांनी सांगितले कि पोलीस स्टेशन बिबवेवाड़ी येथे गुरनं १९६/२०२४ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ कलम १३७(२) प्रमाणे दाखल असून सदर इसमाने त्याच्या सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेलेले आहे.

पुढ़ील तपासकामी बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथील तपासी अधिकारी यांचे ताब्यात या दोघांना देण्यात आले.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/माणिक वी.चौधरी यांच्या सूचनेनुसार पोसई/ जाथव,पोहेकॉ/गणेश चौधरी,पोहेकॉं/राजु सुद्रिक,पोना/विष्णु भागवत,पोकॉ/किशोर जाथव,पोकॉ/दहिफळे, पोकॉ/राजेश राठोड, मोबाईल सेलचे पोकॉ/ राहुल गुंडू यांनी केली आहे.

You cannot copy content of this page