अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार करणारा आरोपी काही तासातच गजाआड तोफखाना पोलिसांची कारवाई
अहमदनगर (दि.२७ ऑगस्ट प्रतिनिधी):-अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश मिळाले आहे.
दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी तोफखाना पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली की,यातील आरोपी किरण पडघडमल याच्याशी ओळख झाली व काही दिवसांतच लग्नासाठी मागणी करुन लग्न ठरले.त्यानंतर फिर्यादी हिच्या सोबत डिग्रस,ता.राहुरी येथे साखरपुड्यात लग्न करत असताना फिर्यादी हिचे वय कमी असल्याने लग्न पार पाडले नाही परंतु आरोपी किरण पडघडमल हा फिर्यादी हिचे संपर्कात राहुन तिच्याशी बोलणे करत जवळीक साधत होता.
त्यातच एकेदिवशी फिर्यादी हिचे घरी कोणी नसल्याचा फायदा घेवुन आरोपी किरण पडघडमल हा फिर्यादीच्या घरी गेला व आपले लग्न होणार आहे असे म्हणुन फिर्यादी हि अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील तिच्याशी शारिरिक संबंध केले.त्यानंतर देखील फिर्यादीच्या एकटे पणाचा फायदा घेवुन फिर्यादी सोबत वेळोवेळी शारिरिक संबंध केले.
त्यानंतर माझे दुस-या मुली सोबत प्रेम संबंध आहे असे सांगुन तु माझा आदर करत नाही अशी वेगवेगळी कारणे देवुन फिर्यादीसोबत जमलेले लग्न मोडले वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन तोफखाना पो.स्टे गु.र.नं. 954/2024 भा.न्या.सं.2023 चे कलम 64,64(2) 352 बाल.लैगिंक शोषण अधि 4,6,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या वरुन या गुन्ह्याचा पुढील पोलीस उपनिरीक्षक सचिन आर.रणशेवरे यांच्याकडे देण्यात आला होता.सदर गुन्ह्याचे तपासात व गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन तोफखाना पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आरोपीचे तपासकामी रवाना करुन आरोपीचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या.त्यावरुन तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी राहुरी परिसरात आरोपीची माहिती घेवुन सोनगांव सात्रळ परिसरात सापळा लावुन पडघडमल वस्ती येथे आरोपी किरण पडघडमल हा घरातुन निघुन कोल्हार गावाकडे जाण्यासाठी निघाला असल्याची बातमी मिळाल्याने सोनगावात सापळा लावुन आरोपी किरण राजेंन्द्र पडघडमल (वय 24 वर्षे, रा.पडघडमल वस्ती, सोनगांव,ता.राहुरी.जि. अहमदनगर) यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्यानंतर आरोपीस ताब्यात घेवुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं 954/2024 चे तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक सचिन आर.रणशेवरे यांच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या सुचना मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांच्या पथकातील पो.उप.नि श्री.शैलेश पाटील,सफौ/तनवीर शेख,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,सुनिल शिरसाठ, अहमद इनामदार, भानुदास खेडकर,दिनेश मोरे,सुधीर खाडे,सुरज वाबळे,वसिम पठाण,शफी शेख,सुमित गवळी,सतिष त्रिभुवन, शिरीष तरटे,दत्तात्रय कोतकर,सतिष भवर, बाळासाहेब भापसे, चेतन मोहिते,राहुल म्हस्के यांनी केली आहे.