Maharashtra247

सोन्याची चैन व मंगळसुत्र घेवुन त्या बदल्यात बनावट सोन्याचे बिस्कीट महिलेस देवुन फसवणुक करणाऱ्या सराईत आरोपीस कोतवाली पोलिसांनी मुद्देमालासह केले जेरबंद 

 

अहमदनगर (दि.२८ ऑगस्ट):-महिलांना बतावणी करुन सोन्याची चैन व मंगळसुत्र काढून घेवुन त्यांना बनावट सोन्याचे बिस्कीट देवुन फसवणुक करणाऱ्या सराईत आरोपीस कोतवाली पोलीसांनी जेरबंद केले आहे.

दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी घटनेतील फिर्यादी नामे सुमन केशव खोजे (रा.धनगर गल्ली भिंगार अहमदनगर) यांनी फिर्याद दिली त्या माळीवाडा बसस्थानक रोडला जात असताना एका इसमाचे सोन्याचे बिस्कीट रोडला पडल्याचे भासवुन ते दुस-या इसमास सापडल्याचा बहाना केल्याचे व तेच सोन्याचे बिस्कीट तुम्हाला देतो कोनाला काही सांगु नका पण मला या बदल्यात तुमची सोन्याची चैन द्या व हे सोन्याचे बिस्कीट तुम्हाला राहु द्या असे सांगुन पिवळे धातुचा तुकडा देवुन फसवणुक केली आहे.

या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुरनं ९५३/२०२४ बीएनएस २०२३ चे कलम ३१८ (४), ३१६ (२) प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना कोतवाली पोलिस निरिक्षक श्री.प्रताप दराडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला सदर गुन्हा हा तात्काळ उघडकीस आणावा अशा सुचना दिल्याने फिर्यादी कडे सखोल चौकशी करुन आरोपीचे वर्णन घेतले असता त्याने अंगात पांढरा शर्ट,काळे रंगाची पँन्ट तसेच पायात चप्पल डोक्यात टोपी घातलेली आहे व तो गुन्हा करुन नगर कॉलेज रोडला पायी चालत गेला आहे,अशी माहीती मिळाल्याने त्या वर्णनाच्या इसमाचा गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी परीसरात जावुन शोध घेतला असता चांदणी चौक येथे सदर वर्णनाचा इसम हा प्रवासी गाडीची वाट पाहत असल्याचे व त्याची हालचाल संशयीत जाणवल्याने त्याचेकडे सविस्तर चौकशी करता त्याने त्याचे नाव संतोष मोहनराव चिंतामणी (रा. राजगुरुनगर पेठ ता.जि. बीड) असे सांगुन त्याने माळीवाडा येथे सदर महीलेला फसवणुक करुन लुबाडल्याचे सांगीतले.

त्याचे कडुन १ तोळा वजनाची सोन्याची चैन हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्याचेकडे कोतवाली पोस्टे गुरनं ५९८/२०२४ भादवि ४२० या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सुरुवातीस उडवाउडविची उत्तरे दिली पोलीसीखाक्या दाखवताच त्याचे यापुर्वी माळीवाडा येथुन एका महीलेला पंतप्रधान योजनेचे पैसे काढुन देतो असे सांगुन तीच्या गळ्यातील मणी मंगळसुत्र काढुन घेतलेची कबुली दिली असुन त्याचेकडुन एकुण अंदाजे १.७५ तोळे वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,गुन्हे शोध पथकाचे पोसई/महेश शिंदे,पोहेकाँ/योगेश भिंगारदिवे,गणेश धोत्रे, विशाल दळवी,विक्रम वाघमारे,सुर्यकांत डाके, सलीम शेख,दशरथ थोरात,संभाजी कोतकर,अविनाश वाघचौरे,अभय कदम, अमोल गाढे,सतिश शिंदे,अतुल काजळे, मपोना/वर्षा पंडीत, मोबाईल सेलचे पोकाँ/ राहुल गुंडु यांच्या पथकाने केली आहे.

You cannot copy content of this page