सरपंच सुनंदाताई मुरकुटे यांच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या आनंदाने साजरी;चीमुकलीने श्रीकृष्णाचे सुंदर चित्र रेखाटले रांगोळीने
यवतमाळ प्रतिनिधी:-कृष्ण जन्माष्टमी ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात,हा वार्षिक हिंदू सण आहे.
श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला,म्हणून त्या दिवशी हा आनंदोत्सव देश भरात साजरा करण्याची प्रथा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील गावच्या सरपंच सुनंदाताई मुरकुटे यांच्या राहत्या घरी बाळ गोपालची जन्माष्टमी मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली.
गोकुळाष्टमीनिमित्त सरपंच सौ.मुरकुटे यांच्या मुलीने श्रीकृष्णाची सुंदर अशी रांगोळी कलाकृती घरात तयार केली त्याने सर्व महिलांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा क्राईम ब्रांच महाराष्ट्र राज्य आयोगाच्या महाराष्ट्रा अध्यक्ष सौ.निशा उर्फ काजलताई गवई व परिसरातील महिला उपस्थित होत्या. यावेळी सौ.गवई म्हणाल्या की, मुलांच्या कलागुणांना आपण पालकांनी वाव दिला पाहिजे ज्याने मुलांमध्ये नवीन काहीतरी करण्याचा उत्साह निर्माण होतो आणि यातूनच मुले नेहमी यशस्वी होतात.