भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थाचे चेअरमन हे ठेवीदारांचे पैसे घेऊन फरार सर्व ठेवीदारांची तोफखाना पोलीस ठाण्यात धाव;चेअरमन भारत पुंड यांना तात्काळ अटक करण्याची सर्व ठेवीदारांची तोफखाना पोलीस ठाण्याकडे मागणी लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा दिला इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी):-भिस्तबाग चौकातील भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेमध्ये ठेवीदारांचे अंदाजे रक्कम 57 कोटी रुपये होती चेअरमन भारत पुंड यांच्यासह डायरेक्टर बोर्ड मधले अश्विनी भारत पुंड,शोभाबाई गोरक्षनाथ विधाते, जालिंदर देवराम विधाते,अक्षय पांडुरंग शेलार,बबन शहादू पुंड,चंद्रशेखर गोरक्षनाथ विधाते,सचिन दत्तात्रय विधाते,रावसाहेब नथू कळमकर, वैभव बाळासाहेब विधाते सर्व कर्मचारी हे गेल्या काही दिवसापासून पसार झाले आहे.
यामुळे सर्व ठेवीदारांचे धंदद उडाले असून सर्व ठेवीदार तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गेल्या दाखल करण्यासाठी एकत्र जमले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.सर्व ठेवीदारांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली की भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेचे चेअरमन भारत पुंड याला तात्काळ अटक करून आमचे पैसे आम्हाला परत मिळून द्यावे अन्यथा ठेवीदारांचे वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
यावेळी भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेचे सर्व खातेदार यांनी सांगितले की चेअरमन भारत पुंड यांनी सर्व ठेवीदारांना विश्वासात घेऊन सांगितले मी एका पतसंस्थेत पंधरा वर्षे तेथे काम करून ही पतसंस्था उभारली आहे तुमचे सर्व पैसे त्या पतसंस्थेत गुंतवले आहे तुम्ही कुठलीही काळजी करू नका तुम्हाला तुमच्या वेळेला पैसे मिळून जातील असे बोलत सर्व ठेवीदारांना या भारत पुंड यांनी फसवले सर्व ठेवीदारांचे पूर्ण पैसे घेऊन प्रसार झाला झाला.
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेमध्ये सर्व ठेवीदारांचे पैसे होते ठेवीदार जानेवारी महिन्यापासून पैसे काढण्यास गेले असता जानेवारी महिन्यापासून ठेवीदारांना तात्काळ ठेवून पैसे आज देऊ उद्या देऊ करत आतापर्यंत थांबून ठेवले परंतु गेल्या काही दिवसांपासून चेअरमन व कर्मचारी सर्व पसार झाले आहे. या बँकेमध्ये सर्व ठेवीदारांची आयुष्यभराचे जमापुंजी होती पोलीस प्रशासनाने यामध्ये तात्काळ सखोल चौकशी करावी व न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.