डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी ‘या’ नेत्याने जिल्हाधिकारी कार्यालयात घातले लोटांगण
अहमदनगर (दि.२८ ऑगस्ट):-श्रीरामपूर मधील फुले,शाहू, आंबेडकरी चळवळीतील नेते सुभाष त्रिभुवन यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात लोटांगण घालून आंदोलन केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याच्या मागणींसाठी सुभाष त्रिभुवन यांनी हे लोटांगण घातलं आहे.
यावेळी त्रिभुवन म्हणाले की, जिल्हाधिकारी साहेबांना विनंतीपूर्वक मागणी करतो की पूर्णाकृती पुतळ्यास लवकरात लवकर परवानगी देण्यात यावी अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.