Maharashtra247

जिल्हा माहिती अधिकारीपदी डॉ.किरण मोघे रुजू

 

अहमदनगर (दि.२८ प्रतिनिधी):- अहमदनगर जिल्हा माहिती अधिकारी या पदाचा कार्यभार डॉ.किरण मोघे यांनी आज स्वीकारला.

डॉ.किरण मोघे हे अहमदनगर येथे रूजू होण्यापूर्वी पुणे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून २०२१ पासून कार्यरत होते.त्यांच्या जागेवर अहमदनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रवींद्र ठाकूर यांची बदली झाली आहे.

अहमदनगर जिल्हा माहिती अधिकारी पदावर रूजू झाल्यावर  शिर्डी उपमाहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने संतोष गुजर,धनंजय जगताप,सुरज लचके, प्रविण मुठे,चिंतादेवी जयस्वार यांनी त्यांचे स्वागत केले. 

डॉ.मोघे यांनी यापूर्वी नांदेड, रत्नागिरी,नाशिक,नंदुरबार येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आणि मुख्यमंत्री सचिवालयात माहिती अधिकारी पदावर काम केले आहे.

 

You cannot copy content of this page